Wednesday, October 23 2019 6:42 am

ठाण्यातील गोविंद पथकांचा जितेंद्र आव्हाड आणि अविनाश जाधव यांना पाठिंबा 

ठाणे  – महाराष्ट्र ही सण ,उत्सवांची भूमि आहे. या भूमितील सण, उत्सव साजरे झालेच पाहिजेत. असाच दहिहंडीचा उत्सव आहे. मात्र, या उत्सवावर निर्बंध आणले जात आहेत. या निर्बंधांना आव्हान देऊन गोविंद पथकांच्या पाठीशी उभे राहण्याची हिंमत जितेंद्र आव्हाड आणि अविनाश जाधव यांनी दाखवली आहे.  त्यामुळे आम्ही १४८ ठाणे आणि १४९ मुंब्रा -कळवा मतदार संघातील गोविंदा पथके या दोघांना पाठिंबा देत आहोत. त्यांच्या विजयासाठी आम्ही कितीही ‘थर’ लावण्यास तयार आहोत, अशी घोषणा ठाण्यातील गोविंद पथकांनी पत्रकार परिषदेत  केली.
ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचे राकेश यादव, सार्वजनिक गोकुळ अष्टमी उत्सव खोपटचे अमित पेंढारे,  सह्याद्री गोविंदा पथकाचे संदीप दळवी, सांस्कृतिक गोविंदा पथकाचे आप्पा  जाधव, श्री गणेश गोविंदा पथकाचे दिपेश  दळवी, जय मल्हार गोविंदा पथकाचे निहार नलावडे,  अलंकार गोविंदा पथकाचे विक्रांत चव्हाण,  एक संघर्ष मित्र मंडळाचे कल्पेश  मिठबावकर, जय वीर हनुमान  गोविंदा पथकाचे निनाद ढापले, श्री कृष्णा गोविंदा पथकाचे दिनेश मांडवकर, टेेेकडीचा  राजा गोविंदा पथकाचे समीर गावसकर हे या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. विशेष म्हणजे मुंबई येथील जय जवान गोविंदा पथकाचे प्रमुख…… हे देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते.
गोविंदा पथकाच्या प्रमुखांनी  सांगितले की,  आनंद दिघे यांनी दहिहंडीची परंपरा येथे रुजवली. त्यानंतर मराठी मातीतील हा सण सातासमुद्रापार नेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी परिश्रम घेतले. आमच्या सारख्या मध्यमवर्गीय तरुणांना स्पेनच्या कॅसलर्स बरोबर ताठ मानेने उभे केले. मात्र,  न्यायालयाच्या आदेशाने या मराठी मातीतील खेळावर निर्बंध आले. त्या विरोधात आ. आव्हाड आणि अविनाश जाधव यांनी लढा दिला. आज   जितेंद्र आव्हाड याांच्या साथीने दहिहंडी आणि गोविंदा पथकांमधील ऊर्जा जीवंत ठेवण्याचे काम अविनाश जाधव हे करीत आहेत. न्यायालयाने लादलेले कडक निर्बंध आणि ते न पाळल्यास दाखल होणारे गुन्हे याची तमा न बाळगता जाधव हे नौपाड्यात दहिहंडीची उभारणी करून गोविंदा पथकांना जीवंत ठेवत आहेत  ते कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात याच्याशी गोविंदा पथकांना देणे घेणे नाही.  ते आमच्यासाठी लढतात; मराठी सण आणि संस्कृती टिकवण्यासाठी लढतात,  हेे अतिशय महत्वाचे आहे.  म्हणूनच आम्ही सर्व गोविंदा पथके अविनाश  जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पााठीशी  उभे राहिले आहोत. आमचा     पाठींबा हा केेवळ दिखाव्याचा नाही तर  आम्ही सर्व गोविंदा  प्रचारासाठी बाहेर पडणार आहोत.  या दोघांच्या विजयासाठी परिश्रमाचे कितीही थर लावण्याची आमची तयारी आहे. मराठी सण वाचविण्यासाठी अविनाश जाधव यांच्या पाठीशी तमाम मराठीजण उभे राहतील, असा विश्वासही यावेळी गोविंदा पथकाच्या प्रमुखांनी व्यक्त केला.
यावेळी  पत्रकार परिषदेदरम्यान अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचे आगमन झाले.  त्यावेळी  गोविंदा पथकाच्या प्रमुखांनी जाधव यांचा सत्कार करून निवडणुकीत सक्रीय पाठिंबा देत असल्याचे त्यांना सांगितले.