ठीक ठिकाणी जोरदार स्वागत..
ठाणे, 10 ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा धडाका जोरदार सुरू आहे. शनिवारी पुन्हा प्रभाग क्रमांक ३ मधील कोलशेत पासून रॅलीला सुरवात झाली. यावेळी ठिकठिकाणी केळकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. आमचा आमदार जनसेवक अशी घोषणा देखील यावेळी दिल्या गेल्या.
शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास या झंझावात रॅलीचा कोलशेत भागातुन सुरू झाला यावेळी कोकण मधील मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना शहर प्रमुख हेमंत म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुरेश पाटील, अनुराधा रौडे, मंडळाध्यक्ष हेमंत म्हात्रे, संजय पाटील, प्रभाग अध्यक्ष तन्मय भोईर, हरीश दादा पुणेकर, रवी रेड्डी जी, अल्केश कदम, राकेश जैन, निलेश पाटील आदींचा इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोलशेत खालचा गाव हनुमानाचे दर्शन घेऊन रॅलीची सुरवात झाली. पुढे वरचा गाव, लोढा आमारा, एव्हरेस्ट वर्ल्ड, सिद्धेश्वर गार्डन, काव्यधारा, ढोकाळी नाका, हायलँड रेसिडेन्सी, यशस्वी नगर, ब्राईट लँड रुणवाल गार्डन सोसायटी शिवाजीनगर, बाळकुम नाका, बाळकुम पाडा नंबर एक, दोन, तीन, आंबेडकर नगर, गणेश बावडी, दादालानी रोड, तन्मय भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयापर्यंत येऊन समाप्त झाली. या रॅलीत ठीक ठिकाणी केळकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण देखील केले. एकूणच केळकर यांचा प्रचाराचा झंझावात वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे.