Sunday, April 18 2021 10:56 pm

ठाण्यातील “आय सर्जन” ठरल्या मॉडेलिंग विजेत्या   कोचीनच्या स्पर्धेत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व 

ठाणे : ठाण्याच्या नामांकित रुग्णालयात कार्यरत असलेल्या आय सर्जन डॉ. रजनी मशिलकर या कोचीनच्या मॉडेलिंग स्पर्धेत विभाज्याच्या मानकरी ठरल्या. कोविडच्या काळात मिळालेला वेळ आणि छंद यामुळे कोचीनच्या स्पर्धेत भाग घेतला. अन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि विजयाच्या मानकरी ठरल्या.

ठाण्यात राहणाऱ्या आणि वेदांत रुग्णालयात आय सर्जन असलेल्या डॉ. रजनी म्हशीलकर यांनी वेळेचा सदुपयोग करून आपला छंद जोपासला. त्यामुळे “असेल आवड तर होईल सवड” या म्हणीला सार्थ ठरणारी किमया साधली. नेहमीच व्यस्त असलेल्या मात्र कोविड मध्ये उसंत मिळालेल्या फावल्या वेळेत डॉ. रजनी म्हशीलकर यांनी कोचीनच्या स्पर्धेत भाग घेतला. ऑडिशन, सेमी फायनल, फायनल असा प्रवास यशस्वी करून टॉप-६ मध्ये प्रवेश केला. मिसेस इंडिया ग्लोबल कॉन्टेस्ट ३० मार्च रोजी झाल्या यात डॉ. रजनी म्हशीलकर यांनी ऑपेरा मिसेस इंडिया २०२१, मिसेस इंडिया ग्लोबल वेस्ट २०२१ आणि मिसेस विव्हर चॉईस २०२१ या तीन पारितोषिकाचे मानकरी ठरल्या. डॉ. रजनी म्हशीलकर यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. यशाने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या विजयबाबत डॉ. रजनी म्हशीलकर म्हणाल्या मी कोविड मध्ये मिळालेल्या वेळेचा फायदा घेतला. मला मॉडेलिंगच्या छंद होता. तो पुरा करण्याची संधी मिळाली. मात्र आय सर्जन हे माझे प्रोफेशन आहे. यामध्ये खूप मान, सन्मान आहे. स्पर्धेसाठी गेल्यानंतर मस्कारा, लेन्समुळे डोळ्या झालेल्या इजा यावर मी उपचार केले. आय सर्जन असलायचा मला खूप फायदा झाला. तसेच मी नेत्रदान करणार आहे. अन लोकांनीही नेत्रदान करावे म्हणून जागृती करणार आहे. जगात अनेक लोक अंध आहेत. कॉर्निया मिळत नसल्याने आणि ते खराब झाल्याने उपयोगात येत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया होत नाही. अन एक अंध जेव्हा बघू लागेल तेव्हा जो आनंद मिळतो त्याची किंमत नाही. अशी प्रतिक्रिया डॉ. रजनी म्हशीलकर यांनी व्यक्त केली.