ठाणे, 31 नगरपालिकेचे लोकांमधून निवडून आलेले माजी नगराध्यक्ष ठाण्याचे पहिले महापौर माजी खासदार शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख ऑलंपिक संघटनेचे उपाध्यक्ष, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे संस्थापक, कबड्डी व खोखो खेळाचे राज्यस्तरीय खेळाडू,ठाणे मॅरेथॉनचे जन्मदाते असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले ठाणे शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेले सतीश सिताराम प्रधान (वय 85)यांच्या पार्थिवावर आज ठाण्यातील जवाहर बाग वैकुंठभूमीत शाहीइतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या समयी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे तोफांची सलामी देण्यात आली. वैकुंठभूमीत उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतीश प्रधान म्हणजे ठाण्याचे वैभव तसेच ठाण्याचे खऱ्या अर्थाने प्रधान होते व त्यांनी ठाणे शहरात अमुलाग्र बदल घडवले व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आम्हाला संधी मिळाली याबद्दल आभार व्यक्त केले.
सतीश सतीश प्रधान यांचे पार्थिव आज सकाळी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या समयी विविध पक्षांचे तसेच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व कुटुंबाचे सात्वन केले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयात जातीने उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण प्रधान परिवारांचे सात्वन केले. सतीश प्रधान यांनी शिवसेनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच ठाणे शहर व ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांनी कृतज्ञतापूर्वक श्रध्दांजली अर्पण केली. उध्दव ठाकरे
यांच्या समवेत माजी खासदार राजन विचारे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे इत्यादी सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते .मंत्री प्रताप सरनाईक मंत्री गणेश नाईक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश म्हस्के शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे ठाकरे सेनेचे तात्यासाहेब माने , कृष्णकुमार कोळी मधुकर देशमुख इत्यादीसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंत्यदर्शन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव जवाहर बाग स्मशानभूमीत आणण्यात आले तेथे ठाणे पोलीस आयुक्तालय तर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली या समयी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सतीश प्रधान यांनी ठाणे शहरासाठी केलेले काम अविस्मरणीय आहे व ते कायम ठाणेकर यांच्या स्मरणात राहतील असे उपस्थितांनी सांगितले.