Tuesday, July 7 2020 1:08 am

ठाणे शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने कोपरी येथील हुतात्मा चौकातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण

ठाणे :- राज्यसह संपूर्ण देशभर आज कारगिल विजय दिवसाचा २० व वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये तिरंगा फडकवला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिनानिमित्त आज  ठाणे शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्यावतीने ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांचा प्रमुख उपस्थितीत कोपरी पूल, ठाणे येथे हुतात्मा चौकातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले सुमारे अडीच महिने चाललेल्या या ‘ऑपरेशन विजय’मध्ये देशाने ५२७ पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले. तर १३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले .  रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढलेल्या सर्व जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे, प्रदेश ओबीसी विभाग सरचिटणीस कृष्णा भुजबळ,गिरीश कोळी, प्रमोद गांधी, मधुकर पाटील, संतोष बागल, विजय बागल आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते