Saturday, July 11 2020 9:13 am

ठाणे शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत मुख्य जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने शुक्रवार दिनांक 10 जानेवारी ,2020 रोजी सकाळी 9.00 ते शनिवार दिनांक 11 जानेवारी ,2020 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिकेचा स्वतःचा पाणी पुरवठा व स्टेम प्राधिकरणकडून होणारा पाणी बंद पुरवठा राहणार आहे.

     शुक्रवार दिनांक 10 जानेवारी ,2020 रोजी मुख्य जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.