Tuesday, January 22 2019 2:00 pm

ठाणे शहरातील काही भागात दर बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे : उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत जलसंपदा विभागाने चौदा टक्के पाणी कपात करणेकरिता सर्व पाणी उचल संस्थाना कळविले असल्याने स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी २४ तास बंद राहणार आहे.

            ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी  पुरवठ्याचे नियोजन करून बुधवार दिनांक २४ ऑक्टोंबर २०१८ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० पर्यत १२ तास शहरातील घोड़बंदर रोड़पातलीपाड़ापवार नगर,कोठारी कम्पाऊन्ड़आझादनगरड़ोगरीपाड़ा, वाघबीळओवळा इत्यादी भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार दिनांक २४ ऑक्टोंबर २०१८ रोजी रात्री 9.००ते गुरुवार दिनांक २५  ऑक्टोंबर २०१८ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत १२ तास समतानगर,गांधीनगर,ऋतूपार्क,साकेत,महागिरी,उथळसर इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

       या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असूननागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.