Friday, May 24 2019 9:08 am

ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार !

ठाणे-:महाराष्ट्र्र औद्योगिक महामंडळ व लघुपाटबंधारे विभाग यांच्याशी झालेल्या  बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी गुरुवार दिनांक 6 डिसेंबर, 2018 रोजी रात्रौ 12.00 ते शुक्रवार दिनांक 7 डिसेंबर, 2018 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यंत (24 तास) बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या कळवा, खारेगांव, पारसिकनगर, आतकोनेश्‍्वरनगर, घोलाईनगर, रेतीबंदर, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर, देसाई तसेच इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र. 1 (एम.आय.डी.सी.कडून होणारा पाणी पुरवठा) इत्यादी परिसराचा पाणी बंद राहणार आहे.

               या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.