Monday, May 19 2025 11:57 pm

ठाणे लोकसभेत धनगर समाजाचा उमेदवार

ठाणे 19 : धनगर समाजाचे मल्लिकार्जुन पुजारी यांना प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीकडून ठाणे लोकसभेतील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनेक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचे प्राबल्य असले तरी धनगर समाजाला परभणीचे एक जागा सोडली तर कोणत्याच पक्षाने धनगर समाजाला उमेदवारी दिलेली नाही.प्रत्येक निवडणुकीला धनगर समाजाचा वापर केला जातो. १०० पेक्षा जास्त मतदार संघात धनगर समाजाचे प्राबल्य आहे. त्यामध्ये बारामती व माढा लोकसभा मतदार संघात तर धनगर समाजाचाच उमेदवार निवडून येऊ शकतो असे असताना देखील कोणत्याच पक्षाने याठिकाणी देखील धनगर उमेदवार दिलेला नाही.याच बरोबर धनगर समाजाला धनगर आरक्षणासंदर्भात सर्वच सरकारने शब्द देऊनही तो पाळला नाही.त्यामुळे धनगर समाज नाराज आहे.आणि समाजाने बंडाचे हत्यार उपसले आहे.आणि याला साथ मिळाली आहे ओबीसी समाजाची,धनगर व ओबीसी समाजाने एकत्र येत संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे.
धनगर व ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना केली असून या पार्टीच्या वतीने ठाणे लोकसभा मतदार संघातून मल्लिकार्जुन पुजारी या धनगर समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे.मल्लिकार्जुन पुजारी हे राष्ट्रीय स्वाभिमानी संघटना तसेच जय मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहे. सन २००२ ते २०१७ मध्ये त्यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.तर पुजारी यांचा मुलगा पाल व गडरिया समाजासाठी काम करणाऱ्या शेफर्ड टायगर फोर्स या संघटनेचे काम पाहत आहे.ठाणे लोकसभा मतदार संघात पाल व गडरिया समाजाची संख्या देखील मोठी आहे.२०२९ ठाणे लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. तसेच चळवळीतील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.अशा सक्षम व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी देण्यात आल्याने ठाणे लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार असे दिसून येत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघात ओबीसींची मोठ्या संख्या आहे तर धनगर समाजाचे १ लाखापेक्षा जास्त मतदान आहे.असे असेल तरी ठाणे लोकसभा मतदार संघात समाज मात्र अजून हि दुर्लक्षित आहे.त्यामुळे धनगर समाजाला याठिकाणी उमेदवारी मिळाल्याने ठाणे लोकसभेची निवडणुक अधिकच रंगतदार होणार यात काही शंका नाही .