Thursday, December 12 2024 8:21 pm

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

ठाणे 25 : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे, सोमवारी ठाणे रेल्वेस्थानकाच्या150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. सॅटिस पुलाखालील फेरीवाले, आलोक हॉटेल ते तीन हात नाका (गोखले रोड), राम मारुती रोड, गांवदेवी भाजी मार्केट बाहेरील फेरीवाले, जांभळी नाका, तलावपाळी तसेच कपडा मार्केट परिसरात अनधिकृतपणे व्यवयाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली.

या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली फळे, भाजीपाला व इतर साहित्य सेवाभावी संस्था यांना देण्यात आले असून सदरचा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला असून सर्व फूटपाथ नागरिकांकरिता मोकळे करुन देण्यात आले.

नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधून अनधिकृत फेरीवाल्यांबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. सदरची कारवाई उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली.
.