Monday, January 27 2020 9:16 pm

 ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होणारच

वसई :- मिरा-भाईंदरमध्ये महापौर वर्षा मॅरेथॉन होणार असल्याची माहिती महापौर डिंपल मेहता यांनी महासभेत दिली.  महाराष्ट्रावर पुराचे महासंकट आले असून  ठाणे महापालिका मॅरेथॉन वर पैसे खर्च करत असून  महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करून तो निधी पूरग्रस्तांना पाठविण्यात यावा, असे सांगत विरोधकांसह अनेक सामाजिक संस्थांनी पालिकेला विरोध दर्शविला होता.

 १८ ऑगस्टला आयोजित केलेली महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करून त्याचा निधी कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणातील पूरग्रस्तांना देण्यात यावा, अशी जोरदार मागणी बुधवारी झालेल्या  मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत काँग्रेस नगरसेवकांनी केली. काँग्रेस नगरसेवकांनी मॅरेथॉनविरोधातील फलक घेऊन सभागृहात प्रवेश करत प्रचंड गोंधळ घातला. शहरातील अनेक सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांनी महापौर वर्षा मॅरेथॉनला विरोध दर्शवत तो निधी पूरग्रस्तांना पाठविण्यात यावा अशी मागणी केली होती. महापौरांनी मात्र काँग्रेसचा विरोध धुडकावून लावत, महापौर मॅरेथॉन होणारच असे सांगितले. पूरग्रस्तांबाबत आम्हालाही काळजी वाटते असे सांगत, मॅरेथॉनची पूर्ण तयारी झाली आहे. तसेच पारितोषिक, मेडल्स, प्रमाणपत्र, सुद्धा तयार झाली आहेत. ज्या हजारो स्पर्धकांनी भाग घेतला आहे आणि त्याचे प्रवेशशुल्क परत देणे, तसेच इतर बाबींसाठी झालेला खर्च परत घेणे अशक्य आहे. त्यातून काही साध्य होणार नसल्याने वर्षा मॅरेथॉन होणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. पूरग्रस्तांसाठी महापालिका आयुक्त तसेच सर्व नगरसेवक, प्रथम वर्ग व द्वितीय वर्ग अधिकारी एक महिन्याच्या पगार, तर कर्मचारी १५ दिवसांचा पगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी सात दिवसांचा पगार देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.