Monday, May 12 2025 5:26 pm

ठाणे महापालिकेतर्फे मतदार जनजागृती अभियान रविवार, २४ मार्च रोजी निघणार सायकल रॅली

ठाणे 19 : ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन यांच्यावतीने रविवार, २४ मार्च रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीचे दोन टप्पे असतील. एक रॅली ठाणे-पवई-ठाणे अशी आहे. तर दुसरी रॅली ठाणे- नितीन जंक्शन ते मीठबंदर रोड, ठाणे खाडीजवळ, ठाणे (पूर्व) अशी आहे. या दोन्ही रॅलीसाठी नाव नोंदणी सुरू आहे. या रॅलीतील सहभाग विनामूल्य आहे. जास्तीत जास्त सायकल प्रेमींनी या रॅलीत सहभागी होऊन मतदार जागृतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केले आहे. पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहनही या सायकल रॅलीद्वारे करण्यात येणार आहे.

निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरू
निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरुआहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून त्या त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र.६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. मतदार यादी अद्यावत व शुद्ध करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत.

सायकल रॅलीचा तपशील –

लाँग रॅली
तारीख: रविवार, २४ मार्च २०२४.
मार्ग: ठाणे ते पवई आणि परत
भेटण्याची वेळ : सकाळी ६
रॅलीची वेळ : सकाळी ६.१०
भेटण्याचे ठिकाण : श्री माँ बालनिकेतन शाळा, ठाणे पूर्व, हरी ओम नगर नाक्याजवळ
रॅलीचे शेवटचे ठिकाण : मीठबंदर रोड, ठाणे खाडीजवळ, ठाणे (पू)
संपर्क – पंकज रिझवानी (८१०४८५८५९०)

लोकल रॅली
तारीख: रविवार, २४ मार्च २०२४.
मार्ग: नितीन जंक्शन ते मीठबंदर रोड, ठाणे खाडीजवळ, ठाणे (पु.)
नितीन जंक्शन सर्व्हीस रोड – तीन हात नाका – हरिनिवास सर्कलवरून सरळच – कोपरी ब्रीज- डावीकडे ठाणे स्टेशन पुर्व मार्गे – अष्टविनायक चौक – मीठबंदर रोड, ठाणे खाडीजवळ, ठाणे (पू.)
भेटण्याची वेळ : सकाळी ७
रॅलीची वेळ : सकाळी ७.१५
भेटण्याचे ठिकाण : नीतीन जंक्शन, मर्क्युरी हॉटेल जवळ
रॅलीचे शेवटचे ठिकाण : मीठबंदर रोड, ठाणे खाडीजवळ, ठाणे पूर्व
संपर्क – संकेत सोमाणे (९८६७७७०२८६)

नोंदणीसाठी लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdhjQ4Ssy99b1PsgQI268HrmHzJotkcbdDwXY4VI0qOXY4_uQ/viewform