Wednesday, August 12 2020 9:38 am

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे होणार पुन्हा सर्वेक्षण

ठाणे :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाला सर्वेक्षणाच्यावेळी काही कारणास्तव गैरहजर असलेल्या सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण महापालिकेच्या प्रभाग समिती निहाय करण्यात येणार असून फेरीवाल्यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्वेक्षण करून घ्यावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याकरीता “पथ विक्रेता (उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४ (२०१४ चा ७) मधील तरतुदीप्रमाणे ठाणे महानगरपालिकेकडून पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांचे सन २०१६ मध्ये त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणाचे वेळी काही कारणास्तव गैरहजर असलेल्या अथवा सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे असे ठाणे महानगरपालिका व शहर फेरीवाला समितीच्यावतीने घेण्यात आला आहे.

त्यानुसार सर्वेक्षण न झालेल्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रभाग समिती निहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले नाही अशा फेरीवाल्यांचे प्रत्यक्ष व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी व्यवसायाच्या ठिकाणीच नोंदणी फॉर्म देण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यक्तीश: उपस्थित राहणे आवश्यक आहे. नोंदणी फॉर्म फी रु.१००/- फॉर्म देताना घेण्यात येणार असून प्रत्यक्ष नोंदणीची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देताना रु.९००/- नोंदणी फी घेण्यात येणार आहे..

फेरीवाल्यांचे सर्वेक्षणासाठी प्रभाग समिती निहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे

उथळसर दि.२३, जुलै २०१९ ते दि २६ जुलै २०१९,

माजिवडा-मानपाडा दि.२९ जुलै २०१९ ते दि.३१ जुलै २०१९,

लोकमान्य-सावरकरनगर दि.०१ ऑगस्ट २०१९ ते ०३ ऑगस्ट २०१९,

वर्तकनगर दि.०५ ऑगस्ट २०१९ ते दि.०७ ऑगस्ट २०१९,

वागळे दि.०८ ऑगस्ट २०१९ दि.१० ऑगस्ट २०१९,

नौपाडा-कोपरी (कोपरी विभाग कार्यक्षेत्रासह), दि.१३ ऑगस्ट २०१९ ते १७ ऑगस्ट २०१९,

कळवा दि.१९ ऑगस्ट २०१९ ते दि.२१ ऑगस्ट २०१९,

मुंब्रा दि.२२, २३, २६ व २७ ऑगस्ट २०१९,

दिवा दि.२८ ऑगस्ट २०१९ ते दि.३१ ऑगस्ट २०१९

 

रोजी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ज्या फेरीवाल्यांचे यापुर्वी सर्वेक्षण झालेले आहे अशा फेरीवाल्यांना पुन्हा सर्वेक्षण करण्याची गरज नाही