ठाणे महानगरपालिका,ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा पुढाकार
ठाणे, 27:- सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातील विविध घटकांकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येतात. मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त दि.6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्ताने ठाणे महानगरपालिका, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारातून शुक्रवार, दि. 5 जानेवारी 2024 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन हे शिबीर यशस्वी करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.