ठाणे 25 : ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आज 13 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशाच्या लोकशाही परंपरेच जतन करुन निपक्ष:पातीपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करणेबाबतची शपथ महापालिका अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मारुती खोडके, प्रशांत रोडे, निवडणूक सहाय्यक आयुक्त समीर जाधव, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपकार्यालयीन अधीक्षक जयानंद नायकोडी यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नावनोंदणी करुन घेणे, देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरुक करण्यासाठी केला जातो. यावेळी’मै भारत हु’ हे गीत प्रसारित करण्यात आले.