६३ लाख रुपयांच्या थकबाकीची झाली वसूली
ठाणे (१९) : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध होर्डिंगधारकांनी जाहिराती फीची थकविल्याप्रकरणी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत, जाहिरात फी थकविलेल्या १८ होर्डिंगवरील जाहिरातींचे फ्लेक्स उतरवण्यात आले. फ्लेक्स काढण्याची कारवाई सहायक आयुक्त अलका खैरे यांच्या नेतृत्वात जाहिरात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईनंतर, जाहिरातदारांनी त्यांच्याकडे थकीत असलेली ६३ लाख रुपयांची जाहिरात फी जमा केल्याची माहिती जाहिरात विभागाचे उपायुक्त महेश सागर यांनी दिली.