ठाणे( १४): ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये भातसा धरणातून उपलब्ध होणारा पाणी पुरवठा, पिसे पंपिंग स्टेशन व टेमघर जलशुध्दीकरण केंद्र तसेच स्टेम प्राधिकरण योजनेमधील होणारे तांत्रिक बिघाड, गळती, वीज पुरवठा खंडीत होणे तसेच शटडाऊन या कारणामुळे शहराला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी शहरातील काही भागात कमी दाबाने व अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त होत आहेत. यावर उपाययोजना म्हणून मुख्य वितरण व्यवस्थेमध्ये पाण्याचा दाब संतुलित ठेवण्यासाठी उपलब्ध पाणी पुरवठयाच्या नियोजनाचा भाग म्हणून झोनिंग पध्दतीने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
शहरातील प्रत्येक भागात दर १५ दिवसातून एक दिवस १२ तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे