Sunday, September 15 2019 3:14 pm

ठाणे पालिकेचे दोन लाचखोर लिपिक जाळ्यात

ठाणे:घराचे बांधकामाचे पाडकाम टाळण्यासाठी ठाणे पालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समितीमधील लिपिकाला  तक्रारदाराकडून तीन हजारांची लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहाथ अटक करण्यात आली. किशोर झेंडे व अरविंद जैस्वार अशी लाचखोर लिपिकांची नावे असून आरोपी झेंडे याने तक्रारदाराकडे पाच हजारांची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर झेंडे यांच्यावतीने जैस्वार याला तीन हजार रुपये ही लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली.