Wednesday, August 12 2020 9:09 am

ठाणे-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

ठाणे :- शनिवार पासून सुरु असल्याले पावसामुळे मध्ये रेल्वे ला चांगलेच झोडपून काढले असताना आज मध्य रेल्वेच्या ठाणे दिवा स्थानका दरम्यान  तांत्रिक बिघाड झाल्याने  ठाणे-दिवा दरम्यानची लोकल सेवा बंद झाली आहे.त्यामुळे प्रवाश्यांचे एकच हाल पाहायला मिळाले सोमवारी   दुपारी सव्वा चारच्या दरम्यान ठाणे- दिवा स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे-दिवा अप आणि डाऊन रेल्वेसेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.  मात्र रेल्वेसेवा ठप्प झाल्याने मुंबई आणि कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे.   दरम्यान, लोकलसेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र हा बिघाड कधीपर्यंत दुरुस्त होईल याची माहिती रेल्वेने अद्याप दिलेली नाही.