Monday, March 8 2021 5:43 am

ठाणे जिल्ह्यात 23 केंद्रांवर 1हजार 434 आरोग्य सेवकांचे लसीकरण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज 23 केंद्रांवर 1 हजार 434 आरोग्यसेवकांचे लसीकरण आज करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील 23केंद्रांवर लसीकरण सुरु झाले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार प्रत्येक दिवस फक्त 100 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यानुसार आज कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना आरोग्यसेवकांना लसीकरणासाठी बोलविण्यात आले होते . संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 23 केंद्रांवर 1हजार 434 आरोग्यसेवकांना लसीकरण करण्यात आले. हे प्रमाण 63.82टक्के आहे.

ठाणे मनपाच्या 4केंद्रांवर 232, कल्याण डोंबिंवली मनपाच्या 3 केंद्रांवर201, मीरा भाईंदर मनपाच्या 3 केंद्रांवर 194,नवी मुंबई मनपाच्या 4केंद्रांवर 237, भिवंडी मनपाच्या 3 केंद्रांवर 158, उल्हासनगर मनपा 1 केंद्रात 85, ठाणे ग्रामीणच्या 5 केंद्रांवर -327आरोग्यसेवकांना लस देण्यात आली आहे.