ठाणे, 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायं. 6.00 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रे सुसज्ज करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुखद व सुलभ व्हावी, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी मतदान केंद्रांचे संचालन महिला अधिकारी व कर्मचारी करणार आहेत. महिला शक्तीच्या माध्यमातून या मतदान केंद्राचे कामकाज चालणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
सखी मतदान केंद्रे
134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 259 (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहनाल (चर्नीपाडा) खोली क्र 2 तालुका भिवंडी जिल्हा ठाणे),
135 शहापूर अ.ज. मतदान केंद्र क्र. – 171 (जिल्हा परिषद शाळा, ता. वासिंद),
136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 167 (रईस हायस्कूल भिवंडी, जुना ठाणा रोड, जुनी बिल्डींग, रु. नं. 3, ता. भिवंडी, जि. ठाणे),
137 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 317 (भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळा क्र. 51),
138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. – 292 (होलीक्रॉस हायस्कूल, नवी इमारत, तळमजला, चिकनघर, कल्याण),
139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 241 (हेवन बेल कॉन्वेंट स्कुल शिरगाव आपटेवाडी तळ मजला खोली क्रमांक 1 बदलापूर पूर्व),
140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 19 (महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ पश्चिम,खोली क्र.1 (तळ मजला) शास्त्रीनगर वांद्रापाडा),
141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 95 (वेदांत कॉलेज, तळमजला रूम नं 1,विठ्ठलवाडी स्टेशन रोड, उल्हासनगर-3),
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र – 118 (कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा जरीमरी माता प्राथमिक शाळा क्र. 18 तळमजला खोली क्र. 1 विजयनगर ता. कल्याण),
143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 261 (ओमकार इंटरनॅशनल स्कूल, डोंबिवली पूर्व.)
144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. – 189 आसदे (ओमकार इंग्लिश मिडीयम स्कूल, एम.आय.डी.सी निवासी विभाग फेज 2 डोंबिवली पूर्व ) मतदान केंद्र क्र. 384, (लोढा वर्ल्ड स्कूल, पलावा, तळमजला, खोली क्र. 1 निळजे, 421204),
145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र क्र. 419 (ए.पी. इंटरनॅशनल स्कूल, खोली क्र. 2 मिरागाव),
146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 484 (लोढा वर्ल्ड स्कूल, तळ मजला, रुम नंबर 1, लोढा कॉम्प्लेक्स जवळ, माजिवडा, ठाणे ),
147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 199 (नेपच्यून इलेमेंट आय टी पार्क, मोकळ्या जागेत मंडप क्र. 1 रोड नं. 22 वागळे इस्टेट, ठाणे),
148 ठाणे विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 319, (एन.के.टी. कॉलेज, तळमजला, पार्टीशन 2 खारकर आळी ठाणे),
149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 50 लघुपाटबंधारे विभाग, कळवा.
150 ऐरोली विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 156 (सरस्वती विद्यालय, तळमजला, पार्टीशन 6 सेक्टर 5 ऐरोली),
151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ – मतदान केंद्र क्र. 128 (सेवेन्थडे ॲडवान्टेज हायर सेकंडरी स्कूल तळमजला रूम नं. 1 सेक्टर 28 सानपाडा, नवी मुंबई ).
याशिवाय जिल्ह्यातील 136 भिवंडी पश्चिम, 137 भिवंडी पूर्व व 149 कळवा मुंब्रा या ठिकाणी पर्दानशील मतदान केंद्रेही तयार करण्यात आली आहेत.