Saturday, January 18 2025 6:28 am
latest

ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समित्यांवर नियुक्त्या

ठाणे, 11 – ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष दिलीप सपाटे आणि जयेश सामंत यांची राज्यस्तरीय अधिस्वीकृती कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. तर ज्येष्ठ संपादक कैलाश म्हापदी यांची पत्रकार कल्याण निधी समितीवर निवड झाली असून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे खजिनदार विभव बिरवटकर यांची मुंबई विभागीय समितीवर नियुक्ती झाली आहे.
पत्रकारांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या राज्याच्या अधिस्वीकृती समितीवर ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, दिलीप सपाटे, जयेश सामंत यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधी समितीवर दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म् हापदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे छायाचित्रकार विभव बिरवटकर यांची मुंबई विभागीय अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या सगळ्यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात आनंद व्यक्त करण्यात आला.