ठाणे २६ – ठाणे व पालघर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी शासनाने अखेर ७१ कोटींची तरतूद केल्याने ११ हजार शिक्षकांचे पगार वेळेवर होणार असून भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याच्या यश आले आहे.
याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांकडे मागणी करून पाठपुरावा केला होता अखेर याबाबत राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग शिक्षण संचालनालयाचे शिक्षण उपसंचालकांनी वेतन निधी उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच रायगड ३२ कोटी, रत्नागिरी २५ कोटी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २८ कोटी रुपयांचा वेतन निधी मंजूर केला आहे.
वेतन निधी कमी पडत असल्याने डिसेंबर महिन्याचे वेतन वेळेवर होईल की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यातच राज्यातील शिक्षकांचे वेतन करणारी शालार्थ प्रणाली मध्ये बिघाड झाल्याने अनेक अडचणी येत होत्या ही शालार्थ प्रणाली लवकर दुरुस्त व्हावी यासाठीही अनिल बोरनारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता यातही सुधारणा झाल्याने शाळांना बिले पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने निधी मंजूर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाणे व पालघर जिल्ह्यातील ११ हजार शिक्षक व शिक्षकेतरांच्या वतीने आभार मानत असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
वर्षभराचा वेतन निधी मंजूर करावा
शासनाने शिक्षकांचे वेतन देण्यासाठी एक वर्षाचा वेतन निधी वेतन व भविष्य निर्वाह पथक कार्यालयाकडे उपलब्ध करून द्यावा जेणेकरून वारंवार शासनाकडे वेतन निधी मागावा लागणार नाही यासाठीही शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.