Saturday, January 18 2025 6:12 am
latest

ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९७ १३ टक्के

निकालात मुलींची बाजी; ९८.०४ टक्के मुली उत्तीर्ण

ठाणे दि. १६: माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ अर्थात दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा ९७.१३ टक्के निकाल लागल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. जिल्ह्यात यंदा १ लाख १३ हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण टक्केवारीत मुलींनी बाजी मारली आहे.

यंदा १ लाख १७ हजार १८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी १ लाख १३ हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ५५ हजार ४७३ मुली परीक्षेस बसल्या होत्या, त्यापैकी ५४ हजार ३९० मुली उत्तीर्ण झाल्या. तर ६१ हजार ७१० मुले परीक्षेस बसले होते, त्यापैकी ५९ हजार ४३५ मुले उत्तीर्ण झाले. त्यामुळे यंदाच्या निकालात मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९८.०४ टक्के असून मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९६.३१ टक्के आहे.

त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण टक्केवारी अधिक असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. या शाळांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी अभिनंदन केले. मागील अकरावर्षातील आकडेवारी खालील प्रमाणे
२०११- ८८.३९
२०१२ – ८८.८७ २०१३. – ८८.९० २०१४ – ८९.७५ २०१५. – ९३.०१ २०१६. – ९१.४२ २०१७. – ९०.५९ २०१८. – ९०.५१
२०१९. – ७८५५२०२०. – ९६.६१. २०२१ – ९९.२८.