ठाणे, 10 जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५ प्राथमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या त्यापैकी १ शाळा बंद करण्यात आली असून सद्यस्थितीत त्यापैकी ४ अनधिकृत शाळा सुरू आहेत. अनधिकृत सुरू असलेल्या ४ शाळेवर नोटीस बजावण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
शाळेत प्रवेश घेताना पालकांनी शाळा अधिकृत, शासन मान्य असल्याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा. पाल्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही यांची दक्षता घ्यावी – शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे
जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेल्या प्राथमिक शाळा बंद केल्याबाबतचे हमीपत्र सादर केलेल्या शाळा
१. जे.के.इंग्लिश हायस्कूल खडवली, ता.कल्याण, ता.कल्याण.
जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेल्या प्राथमिक शाळांची यादी
१. अग्निमाता इंग्लिश स्कुल पिंपळास, ता. भिवंडी
२. सुगरा बीबी इंग्लिश मिडीयम स्कुल तळवली, ता. भिवंडी
३. आर्यण इंग्लिश स्कूल, कोण, भिवंडी, ता. भिवंडी
४. यूनिव्हर्सल शारदा विद्यालय खोणी, ता. भिवंडी.