Wednesday, June 3 2020 12:31 pm

ठाणे जिल्हाधिकारी यांची संकल्पना-टोलफ्री किंवा दूरध्वनीवर संपर्क साधा… धान्य पोहचेल घरी

ठाणे : लॉकडाऊन नंतर जिल्ह्यातील नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी एक अभिनव संकल्पना राबविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टोलफ्री नंबरवर किंवा दूरध्वनीवर संपर्क साधून धान्य संपल्याचे कळवा पत्ता मोबाईल नंबर द्या धान्य तुमच्या दारात येईल अशी ही योजना असून धान्याचा साठा  ठाण्याच्या एनकेटी कॉलेजमध्ये ठेवला असून गरजूंच्या गरजेनुसार यादीद्वारे खात्री करून धान्यासाठी पुरविण्यात येणार आहे अशी माहिती ठाणे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी दिली.
                 ठाण्याच्या मध्यवरठी ठिकाणी असलेल्या एनकेटी कॉलेज संस्थेने हि मोफत विधायक कार्यासाठी देऊ केली आहे. याच एनकेटी कॉलेजच्या हॉलमध्ये प्रशस्त जागेत जिल्ह्याच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या वस्तूंचे पॅकिंग करून तत्पर ठेवण्यात आलेले आहे. गरजू नागरिकांना देण्यात येणाऱ्या धान्यात तांदूळ, गव्हाचे पीठ, दोन दाली, तेल, साबण असे साहित्य असून जिल्ह्यातील गरजूंकडून आलेल्या कोलची दाखल घेणे. त्यांचे पत्ते आणि मोबाईल नंबर नोंदविणे. त्या नंबरचे तालुकानिहाय यादी तयार करून त्या त्या तहसीलदारांना ती पाठविणे, त्यानंतर त्या लाभार्थीची चौकशी आणि खात्री करून घेणे आणि त्यानंतर ते धान्य गरजू पर्यंत पोहचविणे यासाठी स्वतंत्र टीम बनविण्यात आलेली आहे. सदरचा साथ हा तालुकास्तरावर वितरित करून गरजू पर्यंत पोहचविण्यात येत असलायची माहिती नायब तहसीलदार ठाणे डॅनिश पैठणकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाचा टोल फ्री नंबर-१०७७ आणि दूरध्वनी नंबर-२५३० १७४० या क्रमणकावर फोन करून परिस्थिती बिकट आहे. जीवनावश्यक वस्तू संपल्याचे सांगून पत्ता आणि मोबाईल नंबर नोंदविल्यानंतर त्वरित धान्य साठा लाभार्थी नागरिकांच्या घरी पोहचविण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या या योजनेची अंमलबजावणी शासनाच्या गाईड लाईन नुसार सुरूच राहणार आहे. तार्त्यानंतर नार्वेकर यांच्या आदेशानुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पैठणकर यांनी दिली.