ठाणे, १९ : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘गर्जा जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे गायन करण्यात आले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन (नि.) प्रांजल जाधव, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, तहसीलदार राजाराम तवटे, राहुल सारंग, नगरपालिका प्रशासन अधीक्षक बी.जे. निपुर्ते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली.