Wednesday, July 16 2025 2:07 am

ठाणेकरांनो पाणी उकळून व गाळून प्या – महापालिकेचे आवाहन

*नौपाडा, कोपरी, लुईसवाडी भागात पाण्याला वास*

*पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन*
*ठाणे (1) :* ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा, कोपरी, गांधीनगर, हाजुरी, लुईसवाडी या भागात पाण्याला काही ठिकाणी वास येत असून पाणी गढूळ येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या भागाला मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो.
मुंबई महापालिकेच्या जल विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातून जलवाहिनीत गढूळ पाणी येत आहे. तसेच, पाण्याला वासही येतो आहे. हे पाणी पिसे-पांजरापोळ जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्यात येते. तरीही नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.