Monday, January 27 2020 1:57 pm

टोरंट रद्द करा-नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

ठाणे : कळवा -मुंब्रा उपविभागात विद्युत पुरविण्याचे काम टोरोंट कंपनीला दिले आहे. टोरोंट कंपनीचा ठेका रद्द करा या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर टोरंट हटाव समितीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर याना मागण्याचे पत्र सादर केले.
          टोरोंटो हटाव समितीने आपल्या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कळवा -मुंब्रा उपकेंद्रात रिक्त जागा त्वरित भराव्यात, नव्या विद्युत मीटर अर्जानंतर १५ दिवसात बसवावे,विदुत पुरवस्थ्यासाठी दुरुस्तीसाठी आवश्यक सामुग्रीचा पुरवठा तात्काळ करणे, प्रीपेड विद्युत मीटरवर आक्षेप नाही. कर्मचाऱ्यांची सुरक्षा गंभीरतेने उपाययोजना आणि टोरोंटो ठेका रद्द कर्णयच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी याना दिले.