Saturday, April 20 2019 12:09 am

टेनिसमध्ये गार्गीचे दुहेरी यश

पुणे-: मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादवला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अरमानने ध्रुवच्या साथीने २१ वर्षांखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. त्यांनी नितीन सिन्हा व इशाक इक्बाल या बंगालच्या खेळाडूंचा पराभव केला.  बास्केटबॉलमध्ये अपयश महाराष्ट्राला बास्केटबॉलमधील १७ वर्षांखालील मुली व २१ वर्षांखालील मुलांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मुलींच्या १७ वर्षांखालील गटातील उपांत्य फेरीत महाराष्ट्राला पंजाबकडून ८०-७३ असा तर मुलांच्या २१ वर्षांखालील  गटात तामिळनाडूने महाराष्ट्राचा ७८-५७ असा पराभव केला.

महाराष्ट्राच्या व्हॉलिबॉलपटूंना २१ वर्षांखालील मुलींच्या गटात केरळने २५-१९, २५-१८, २५-२२ असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या गार्गी पवारने दुहेरी टेनिस स्पर्धेत सुवर्ण तर एकेरीत कांस्यपदक पटकावले. गार्गीने दुहेरीत प्रेरणा विचारेच्या साथीने १७ वर्षांखालील दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा अरमान भाटिया व ध्रुव सुनीश ही जोडी विजेती ठरली. महाराष्ट्राने या सुवर्णपदकांबरोबरच तीन रौप्य व एक कांस्यपदकाचीही कमाई केली.