Friday, April 19 2019 11:49 pm

टी-20 क्रिकेट बंदच करून टाका : ट्रेवर बेलिस

आंतरराष्ट्रीय पातळीवरील टी-20 क्रिकेट बंदच करून टाका,अशी मागणी इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी आहे त्यामुळे टी-20 क्रिकेट सामन्यांवरून पुन्हा एकदा महासंग्राम सुरू झाला आहे.
‘सतत क्रिकेट खेळत राहिल्यामुळे क्रिकेटपटू व संघाच्या प्रशिक्षकांवर ताण येतो.ते थकून जातात. आंतरराष्ट्रीय टी-20 सामने बंद केल्यास दिग्गज खेळाडू आणि संघाच्या प्रशिक्षकांवरील हे दडपण कमी होईल,असे बेलिस यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या तीन देशांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला अंतिम सामन्यात स्थान मिळवता आले नाही. या मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला असला तरी ऑस्टेलियाविरूद्धच्या सामन्यात दमछाक झाली. या साऱया पार्श्वभूमीवर बेलिस यांनी टी-20चे आंतरराष्ट्रीय सामने थांबवण्याची मागणी केल आहे.