Monday, June 1 2020 2:46 pm

झुणका- भाकर योजना कधी बंद झाली ते कळलच नाही;पवारांनी उडवली खिल्ली  

सोलापुर :- शिवसेनेची झुणका- भाकर योजना कधी बंद झाली ते कळलच नाही आणि आता १० रुपयांमधे थाळी देणार आहे. तुम्हाला राज्य चालवायच आहे स्वयंपाक करायचा नाही अश्या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयांमध्ये जेवणाची थाळी देणार असल्याची घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सोलापुर येथील बार्शी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी शिवसेनेवर टिका करण्यास सुरुवात केली. युतीच सरकार च्या काळ शिवसेनेने १ रुपयांत झुणका-भाकर योजना सुरु केलि होती.  मात्र ही योजना कधी बंद पडली कळलच नाही।  असे शरद पवार म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात ठीक ठिकाणी प्रचार सभा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस वर टिका करत आहेत. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही कुठे कमी पड़त नाही.