Monday, April 21 2025 11:02 am
latest

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा ‘पं हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान

ठाणे,20 ‘बासरी उत्सव’ यंदा गडकरी रंगायतन ठाणे येथे २१ आणि २२ जानेवारीला पार पडत असून प्रख्यात शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. रविवारी २२ जानेवारी रोजी डॉ अत्रे यांना हा पुरस्कार शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान
केला जाणार आहे.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या नावाने असलेल्या पुरस्काराचे वितरण हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी २१ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता सतेज आणि राज या गुरुकुल प्रतिष्ठानच्या दोन शिष्यांमध्ये जुगलबंदी होईल. त्यानंतर प्रख्यात ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांचे गायन तसेच पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरीवादन आहे.

रविवारी २२ जानेवारीला सकाळी १० वाजता प्रख्यात बासरीवादक विवेक सोनार इतर ९० बासरी कलाकारांबरोबर ‘फ्लूट सिम्फनी’ सादर करणार आहेत. त्यानंतर डॉ प्रभा अत्रे यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी पंडित हरिप्रसाद चौरसिया उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर या उत्सवाची सांगता शशांक सुब्रमण्यम आणि पंडित राजेंद्र प्रसन्ना यांच्या बासरी वादनाने होणार