Sunday, July 5 2020 10:24 am

ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचे निधन

मुंबई : जेष्ठ अभिनेत्री शम्मी यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. डिझायनर संदीप खोसला यांनी शम्मी यांच्या निधनाची माहिती ट्विटर च्या माध्यमातून दिली.त्या ८९ वर्षाच्या होत्या आणि दुपारी १ वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे असेही त्यांनी ट्वीट केले आहे.
शम्मी आंटी यांचा जन्म १९३१ साली एका पारसी कुटुंबात झाला. शम्मीचं खरं नाव नरगीस रबड़ी म्हणून होते .त्यांचे पिता अग्यारी मध्ये पुजारी होते ,पण शम्मी ३ वर्षाची असताना त्यांच्या पिताचे निधन झाले .पित्याचे निधन झाल्यानंतर शम्मीच्या आईने पारसी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात जेवण करायचं काम केले .शम्मी आंटी यांनी वयाच्या १८ व्या वर्षी हिंदी चित्रपट श्रुष्ठित काम करायला सुरुवात केlलं .१९४९ साली निर्माता शैख़ मुख्तार यांनी शम्मी ला उस्ताद पेड्रो या चित्रपटात पहिली संधी दिली आणि नंतर शम्मी आंटीने बॉलीवुड मध्ये अनेक चित्रपटात काम केले . सुमारे २०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या शम्मी यांचे विनोदी भूमिका खुप गाजल्या. ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांमध्ये शम्मी यांनी भूमिका साकारल्या होत्या तसेच टेलिव्हीजन मालिकांमध्ये “देख भाई देख ” ,”श्रीमान श्रीमती “,”फ़िल्मी चक्कर ” अश्या अनेक मालिकांमध्ये अनेक वर्षे भूमिका करत राहिल्या. अभिनेते अमिताभ बच्चन आणि माजी खासदार प्रिया दत्त यांनी शम्मी यांच्या निधनाबद्दल टि्वट करून शोक व्यक्त केला आहे.