Sunday, September 15 2019 3:15 pm

जोगेश्वरीला सिलेंडरचा स्फोट ; १३ जण जखमी

मुंबई :- जोगेश्वरी येथे सिलेंडरचा स्फोट झाला असून यामध्ये १३ जण भाजले आहे, जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.  स्फोटाची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

जोगेश्वरी पश्चिम येथील हनुमान चाळ येथे सिलेंडर स्फोट झाला आहे. या  स्फोटामध्ये १३ जण जखमी झाले आहेत. उपचारासाठी जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निरू मलिक, गुडिया गुप्ता, अंश गुप्ता , दीपक राय , तौफिक शेख , राहुल सिंग , शकंतुला कागल, शहनाज शेख , मल्लिका शेख , उशा उमरे, आलिम शेख, प्रियांका नलावडे, अनुष्का सिंग  अशी या स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत.   यात   अंश गुप्ता आणि  आलिम शेख  हे २ वर्षाचे असून ते गंभीर जखमी जाले आहेत.