Thursday, August 22 2019 4:35 am

जे. पी. इंटरनॅशनल इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसला माहीमजवळच्या पाणेरी नदीजवळ अपघात

पालघर-: पालघर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसला माहीमजवळच्या पाणेरी नदीजवळ अपघात झाला. या अपघातात 19 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. तर बस चालकाची प्रकृतीही गंभीर आहे अशी माहिती मिळाली आहे.  स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असताना अपघात झाला. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि त्यानंतर ही बस झाडावर आदळली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत, जखमी विद्यार्थ्यांवर पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात बसच्या काचेचा चक्काचूर झाला. काही महिन्यांपूर्वी याच शाळेची एक बस सहा ऐवजी पाच चाकांवर धावल्याचा प्रकार घडला होता. मात्र त्या घटनेकडे शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला होता.