Tuesday, January 21 2020 8:48 pm

जीपीएस मुळे वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश ९ आरोपींना अटक- ८० गाड्या हस्तगत

ठाणे-:वाहनाच्या मागणीवरून वाहन चोरी करून ते नागालँड येथे बनावट कागदपत्र बनवून राज्यस्थान किंवा कर्नाटकात ट्रान्स्फर करून तिची विक्री करणारी वाहनचोरीच्या टोळीचा वाहनातील जीपीएस तंत्रज्ञानाने पर्दाफाश झाला. ठाणे पोलिसांनी जवळपास १०५ गुन्हे उघडकीस आणून ३ कोटी ४० लाख रुपये किमतीच्या ८० गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. अटक आरोपीना न्यायालयात नेले असता त्यांना १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अटक आरोपीत संदीप मुरलीधर रा. मुंबई, सादिक मेहबूब खान मुल्ला रा. बेळगाव, कर्नाटक, अल्ताब अब्दुलगणी गोकाक रा. बेळगाव, कर्नाटक, विनीत रतन माधीवाल रा. मुंबई, मांगीलाल शुभनाराम जाखड,रा. नागौर, राज्यस्थान, रामप्रसाद गणपतराम इनानिया, रा. नागौर, राज्यस्थान, जावेद उर्फ बबलू मुख्तार खान, रा. प्रतापगड उत्तरप्रदेश, अल्ताब इकबाल कुरेशी रा. प्रतापगड, उत्तरप्रदेश, मोहम्मद युसूफ नईम खान रा, प्रतापगड, उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे. रोबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन १० डिसेंबर, २०१८ रोजी पिकअप व्हॅन चोरीला गेली होती त्याबाबत गुन्हा राबोडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मात्र पिकअप व्हॅनला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याने पोलिसांनी ती ट्रेस केली. ठाणे पोलीस पुण्यात पोहचले. शेतकऱ्याच्या गोदामात सादर चोरलेली पिकअप व्हेन सापडली. पोलिसांनी शेतकऱ्यांना गद्याबाबत विचारले असता त्याने आरोपी विनीत रतन माधीवाल आणि संदीप मुरलीधर सांगितली. पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल ९ जणांना अटक केली.

अटक आरोपीपैकी संदीप मुरलीधर आणि विनीत माधीवाल यांच्यावर चोरीचे गुन्हे होते. त्यांना अटक केल्यानंतर कारागृहात या अन्य आरोपींची ओळख झाली. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हे आरोपी या वाहन चोरीच्या धंद्यात सक्रिय आहेत. ठाणे शहर-३२ गुन्हे. ठाणे ग्रामीण-६,मुंबई-१४, नवीमुंबई-१४, पालघर१२, रायगड-८, पुणे शहर-४, पुणे ग्रामीण-६ नाशिक शहर-१,अहमदनगर-१, आणि गुजरात-४ असे गुन्हे करण्यात आले आहेत. या ठिकाणांवरून या टोळीने १७० गाड्या चोरल्याचा डाटा पोलिसांना सापडला. मात्र पोलिसांना १०५ गुन्हे उघडकीस आणि ८० गाड्या जप्त करण्यात यश लाभले आहे. हि टोळी नागालँड येथे चोरीच्या गाड्याची कागदपत्र बनावट तयार करून त्या गाड्या राज्यस्थान किंवा कर्नाटक राज्यात ट्रान्स्फर करून मग त्या विक्री करीत होते. टोळीने मागणीनुसार सार्वधिक पिकअप व्हॅन चोरल्याचे समोर आले आहे. ज्या गाड्यांची मागणी गाड्या चोरण्यात येत होत्या. अशी माहिती सह आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली.

पत्रकार परिषदेत सह आयुक्त मधुकर पांडेय यांनी वाहन चालक आणि मालकांना कि, वाहनात विकसित तंत्रज्ञान जीपीएस सारख्या प्रणालीचा वापर करावा, वाहन पार्किंग करताना सीसीटीव्ही रेंजमध्ये करण्यात यावी, वाहनावर मालकाचे नाव आणि नंबर लिहावा स्टेरिंग लॉक आणि अलार्म सिस्टीम बसवावी असे आवाहन केले आहे