Monday, May 12 2025 5:55 pm

जिल्हा निवडणूक अधिकारी,ठाणे तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज साधला २४-कल्याण लोकसभा मतदार संघातील अधिका-यांशी संवाद !

ठाणे, 02 आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी,ठाणे तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज डोंबिवलीतील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मुख्य कार्यालयास भेट देवून विविध जबाबदा-या पार पाडणा-या अधिकारी /कर्मचारी वर्गाशी संवाद साधला आणि उपस्थित अधिका-यांना निवडणूकीशी निगडीत प्रश्न विचारत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन करीत असतानाच निवडणूकीशी निगडीत विविध विषयांचा त्यांनी आढावा घेतला.
क्षेत्रिय अधिका-यांनी(Zonal officer) निवडणूकीच्या दिवसापूर्वी (मतदानापूर्वी) संबंधित ठिकाणी पुरेसे फर्निचर, लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी ,दिव्यांगासाठी रॅम्प इ. सुविधा व्यवस्थित आहेत, याची खातरजमा करावी, अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच अधिकारी वर्गाचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले आणि निवडणूक कर्तव्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी महानगरपालिका व पूर्ण जिल्हा प्रशासन आपल्या सोबत राहील, असे सांगत सर्व उपस्थित अधिकारी/वर्गास निवडणूक कामासाठी शुभेच्छा दिल्या.

यासमयी २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते, १४४-कल्याण ग्रामीण मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, २४-कल्याण लोकसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी मंगेश चितळे उपस्थित होते.