ठाणे, २४ – शाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकास होण्यासाठी व क्रीडा कलांना वाव देण्यासाठी
शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत सांस्कृतिक स्पर्धा दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी व क्रीडा स्पर्धा दि. २४ फेब्रुवारी २०२३ आयोजित करण्यात आला होता. ऑलसेंट इंग्लिश हायस्कूल भवाळे, तालुका भिवंडी, ठाणे येथे क्रिडा स्पर्धेत तालुक्यातील क्रीडा स्पर्धेत विजेते विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरीय स्पर्धा राबविण्यात येत आहे. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम करत मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. मनुज जिंदल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. डॉ. भाऊसाहेब कारेकर तसेच पाच तालुक्यातील मार्गदर्शक, शाळेतील शिक्षक, विस्तार अधिकारी, सर्व गट शिक्षण अधिकारी, भिवंडी गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजेते ५० विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य आत्मसात करण्यासाठी समर कॅम्प करण्यात येईल. जेथे विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य मार्गदर्शन करुन आत्मसात करण्यास वाव मिळेल. तसेच पुढील वर्षाच्या क्रीडा स्पर्धा नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात घेण्यात यावे अशी सूचना केली.
विद्यार्थ्यांसाठी सामुहिक व वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहेत यामध्ये खो-खो, कबड्डी, लेझीम, लांब उडी, संगीत खुर्ची, धावणे अशा स्पर्धां सकाळी ९ वाजल्यापासून सुरू करण्यात आले. दिवसभर विविध स्पर्धेत विद्यार्थी सहभाग घेऊ शकतील व क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन व विठ्ठल सारखे वेशभूषा परिधान करून धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा असा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.