ठाणे 19 रक्ताची नाती म्हणजेच कुटूंब नव्हे, २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे लाखो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले आहेत. बारामतीतील जनताही ठामपणे अजितदादांच्या मागे उभी आहे..जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटूंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये. भाजपचे शिर्ष नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा सोडतील असे आशादायी उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
रक्ताची नाती म्हणजेच कुटूंब नव्हे.२ जुलैला माननीय अजितदादा पवारसाहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी महाराष्ट्रातील आम्ही तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्या भूमिकेशी संलग्न होऊन आम्ही देखील कुटूंब म्हणून माननीय अजितदादांबरोबर उभे राहिलो. बारामतीची जनता ही देखील अजितदादांचे कुटूंब आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे कुटूंब संपूर्णपणे अजितदादांच्या मागे उभे राहिलेले दिसेल. माननीय अजितदादांनी बारामतीमध्ये ही शंका उपस्थित केली होती की, मी आणि माझ्या परिवाराला पवार कुटूंबामध्ये एकटे पाडले जाईल, आमच्यावर टीका होईल. पण महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचे कुटूंब आहे. हे त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहे. माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की पवार कुटूंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नका. आपल्या कुटूंबामधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावे. जितेंद्र आव्हाड हे, आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्यापेक्षा मोठे समजतात आता पवारसाहेबांची चुक काढण्याएवढे ते मोठे झाले असतील तर माहीत नाही याचा प्रत्यय भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने नुकताच आला. एकीकडे म्हणायचे पवारसाहेब माझा बाप आहे आणि त्याच बापाचा फोटो यात्रेच्या बॅनरवर नव्हता तर या बॅनरवर राहूल गांधी व स्वतःचा फोटो होता. बापाचा फोटो नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढ लोकसभेच्या जागा मिळतील या सगळ्या जागांवर महायुतीतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन विजयी होईल हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प व मानस आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनडीएचा घटक पक्ष आहोत. महाराष्ट्रात महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही एकत्रित लोकसभेच्या निवडणूकीला सामोरे जात आहोत महायुतीच्या कार्यकर्त्यांचा हाच संकल्प आहे की ४५ प्लस खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले पाहिजेत नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतले शीर्ष नेतृत्व अमितभाई शहा, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे चर्चा करत आहेत. राष्ट्रवादीला लोकसभेमध्ये महायुतीतील सन्मानजनक जागा लढायला मिळतील. येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये आम्हाला मिळणाऱ्या जागांची घोषणा होईल. ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षाचे, ठाणे, भिवंडी व कल्याण लोकसभेमधील समन्वयक म्हणून, तिन्ही पक्षांनी मला नेमलेले आहे. महायुतीच्या भिवंडीतील उमेदवाराचे नाव घोषित झाले असून कल्याण आणि ठाण्याचे नाव घोषित होईल. त्यांना अधिक मताधिक्याने लोकसभेत पाठवायचे ही जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत. लोकसभेचे मतदान पाच टप्प्यांमध्ये आहे शेवटचा टप्पा आपल्याकडे २० मे ला आहे. पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती निभावण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रदेश प्रवक्ते परांजपे यांनी सांगितले.
विजय शिवतारे प्रकरणी मी कालच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आमचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला असता मुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी दूर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवतारे यांना योग्य समज देतील. आमच्यासाठी विजय शिवतारे हा विषय संपलेला आहे. विजय शिवतारे यांना फार महत्त्व देऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली आहे. शिवतारे हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही त्या विषयावर पडदा टाकलेला आहे. शिवसेना या पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना समजूत दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण बारामती लोकसभा मतदारसंघात येणार नाही