Sunday, November 18 2018 10:06 pm

जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्री वर भेट

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक होणार असतानाच आव्हाडांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.उद्धव ठाकरेंशी भरपूर विषयांवर चर्चा झाली मात्रा ती उघड़ बोलता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे नेते मानले जातात म्हणून शरद पवारांच निरोप घेऊन मातोश्री वर गेले असावेत असे म्हंटल जात आहे .भाजपा चा पराभव करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असे शरद पवारांनी अनेकदा बोलून दाखवले आहे कदाचित त्याचीच प्रचिती प्रत्यक्षात दिसून येत आहे. २०१९ ला काही  वेगळे समीकरण जुळतील का प्रसार माध्यमांकडून विचारल्या नंतर हवेची दिशा सांगता येते पण राजकारणाची नाही असे वक्तव्य त्यांनी केले.