Tuesday, July 23 2019 1:57 am

जागतिक कंडोम दिनानिमित्त ठाण्यात एड्स प्रतिबंधपर नृत्य, प्रदर्शन, जनजागृती कार्यक्रम

ठाणे -: जागतिक कंडोम दिनानिमित्त उद्या १३ तारखेस तलावपाळीजवळील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळी नका ,ठाणे पश्चिम येथे सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत एड्स प्रतिबंध व कंडोम जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष ठाणे आणि एएचएफ-इडिया यांनी आयोजित या कार्यक्रमास पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य उपसंचालक गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, ठाणे पालिका उपयुक्त संदीप माळवी, एड्स नियंत्रण उपसंचालक रमाकांत गायकवाड यांची उपस्थिती असेल.
याप्रसंगी प्रसिध्द कलाकार अरुण कदम, कमलाकर सातपुते हे तसेच नैतिक नगाडा हा प्रसिद्ध म्युझिकल ऑर्केस्ट्रा कार्यक्रम सादरीकरण करतील
कार्यक्रमात काय होणार ?

यावेळी ४० फुट कंडोम फुग्यावर युवकांतर्फे स्वाक्षरी मोहीम घेण्यात येईल. ऑलवेज इन फॅशन या कार्यक्रमात पर्ल अकादमी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करून कंडोम थीमचे आकर्षक डिझाईनचे कापडे, व उपकरणांचे प्रदर्शनही पहावयास मिळेल. याठिकाणी मोफत एचआयव्ही सल्ला व तपासणी केंद्र आणि जनजागृती स्टॉल देखील असतील. कंडोम मॅन, प्रश्नमंजुषा व नृत्याद्वारे सादरीकरण केले जातील.