Saturday, January 18 2025 6:52 am
latest

जलेश्वर तलावाजवळील अतिक्रमण काढण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 03: हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाजवळ अतिक्रमणे आहेत. याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमानुसार जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात यासंदर्भात बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अमोल मिटकरी, बच्चू कडू तसेच नगरविकास, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, अतिक्रमण केलेल्या नागरिकांची दुसरीकडे निवासस्थाने आहेत काय याचा शोध घ्यावा. या कारवाईत कुणीही बेघर होणार नाही, याची काळजी घ्यावी. अतिक्रमण काढण्यासाठी नियमानुसार व न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करावी. बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी माहिती दिली.