ठाणे, 6 ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या विविध समस्यांवर मात करत जलद गतीने काम सुरळीत सुरू राहण्यासाठी म्हणून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी अंबरनाथ पंचायत समिती येथे भेट देऊन पाहणी केली. सदर वेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामे जलद गतीने करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले तसेच पंचायत समिती अंबरनाथ येथील सर्व कामकाज सुरळीत सुरू असल्याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती अंबरनाथ येथील गट विकास अधिकारी यांचे अभिनंदन केले. मांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाहणी करून रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सुचना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र येथील जागेबाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात आले.
महिला बचत गटाद्वारे महिलांनी कॅनोपीमध्ये लावलेल्या स्टॉलची पाहणी करून काम उत्तम केल्याबद्दल महिलांचे अभिनंदन करण्यात आले.
शाळा व अंगणवाडी येथे भेट देऊन सोईसुविधा बाबत माहिती घेत. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहून नवं नवे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवण्यासाठी सुचना देण्यात आल्या.
बदलापूर येथील आपला दवाखाना येथे भेट देऊन रूग्णांची गैरसोय होत नसल्याची माहिती घेण्यात आली. तसेच सोनावळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नुतनीकरण करण्यात आलेल्या इमारत बांधकामाची पाहणी करून बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, समाज कल्याण विभाग प्रमुख संजय बागुल, गट विकास अधिकारी नारायणसिंग परदेशी, उप अभियंता बांधकाम विभाग पोतदार, तालुका अभियान व्यवस्थापक स्वाती तुपसौंदरे, तालुका व्यवस्थापक प्रतिक्षा आगीवले, प्रभाग समन्वयक उल्हास अगमे, पंचायत समिती अंबरनाथ येथील सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.