Saturday, August 24 2019 11:08 pm

जमीन विकण्यास विरोध केल्याने पत्नीवर चाकूने केला हल्ला

नगर : पतीला जमीन विकण्यास विरोध केल्याने पत्नीच्या हातावर चाकूने हल्ला करून तिला जखमी केले.चाकूने वार करत असताना तिला शिवीगाळ देखील केली. ही घटना विळद घाट येथील इंजिनिअरींग कॉलेजवळ घडली.
 सुवर्णा सुभाष सानप (रा.विळदघाट, इंजिनिअरींग कॉलेजवळ) या घरी असताना त्यांचा पती सुभाष बाजीराव सानप हा त्यांना म्हणाला की, मी माझी जमीन विकणार आहे.तू मध्ये पडू नकोस, नाहीतर तुला मारुन टाकीन असे म्हणून शिवीगाळ केली. आणि हातातील चाकुने पत्नी सुवर्णा हिच्या मनगटावर चाकुने वार केले
मी माझ्या जीवाचे बरेवाईट करेन व तुझ्या आईवडीलांचे नाव घेईल अशी धमकी दिली. यामध्ये सुवर्णा ही गंभीररित्या जखमी झाली.