Friday, May 24 2019 7:27 am

जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी

ठाणे : नवी मुंबईतून मुंब्रा बायपास मार्गे ठाणे शहरात जाणार्या जड अवजड वाहनांना उद्या २ डिसेंबर पर्यंत प्रवेश बंदी राहील असे नवी मुंबई पोलीस उपायुक्त वाहतूक सुनील लोखंडे यांनी कळविले आहे.

३० तारखेपासून कल्याण येथे सुरु असलेला आगरी कोळी महोत्सव तसेच रविवारी २ डिसेंबर रोजी या महोत्सवाच्या समारोपास मुख्यमंत्री व इतर नेत्यांची उपस्थिती पहाता या मार्गावरील वाहतूक २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत कळंबोली महापे येथून ऐरोली मार्गे जातील.