Friday, May 24 2019 9:18 am

जगद्गुरु नरेंद्र महाराजांचा कोपरीगांवात प्रवचन व दर्शन सोहळा !

ठाणे-: जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ, ठाणे शहर आयोजित प्रवचन व दर्शन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत शनिवार 8 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 1 वाजता पोलीस लाईन मैदान, कोपरीगाव, कोपरी ठाणे (पूर्व) – 400603 येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मोठÎा संख्येने ठाणे -पालघर जिह्यातून भक्तगण आपापल्या विभागातून पारंपारिक वेशभुषा, ढोल -ताशा-लेझीम,= कळसधारी महिला आध्यात्मिक भजन, जगद्गुरुंश्रींचा भव्य असा रथ, अशा विविध सामाजिक, धार्मिक पद्धतीने मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. तसेच साधक दिक्षा, पादुका व गुरुपुजनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे. जगातील समस्त हिंदूंप्रमाणेच धर्म संस्कृती रक्षणाचा ध्वज फडकवणारे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय धर्मांतर केलेल्यांना पुन्हा धर्मात घेणे, विविध धार्मिक, आध्यात्मिक सोहळयातून धर्म जागृती करणे, देहदानाची जनजागृती, रक्तदान, व्यसनमुक्ती, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय सेवा असे विविध उपक्रम संस्थानाच्या वतीने अनेक जिह्यात राबविले जातात. तसेच अनेक ठिकाणी प्रवचन व दर्शन सोहळे संपन्न होत असतात. त्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमही केले जाते.