Thursday, December 12 2024 8:10 pm

छायाचित्रकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शन आवश्यक — खासदार नरेश म्हस्के

ठाणे 21 : रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात छायाचित्रकार त्यांच्या दैनंदिन कामाबरोबरच आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या छायाचित्रात टिपण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देण्यासाठी व छायाचित्रकारांना स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करण्याची संधी देण्यासाठी अशा प्रकारच्या छायाचित्र प्रदर्शनाची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.

१९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २० ऑगस्ट या कालावधीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा आज पार पडला. या सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे, पद्मश्री सुधारक ओलवे, अभिनेत्री काजल काटे, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, तसेच निलेश पानमंद, विभव बिरवटकर, प्रफुल्ल गांगुर्डे, अनुपमा गुंडे, विकास काटे, अशोक गुप्ता, पंकज रोडेकर, आदी पदाधिकारी तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार पलाश उपस्थित होते.

नागरी कामाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध कार्यक्रमांना पाठिंबा देणारी ठाणे ही एकमेव महापालिका असल्याचेही खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद करीत या स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांचे कौतुक केले.

छायाचित्र ही कला आहे, या कलेत छायाचित्रकारांनी सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत आमदार संजय केळकर यांनी सर्व छायाचित्रकारांचे कौतुक केले.

फोटोग्राफीच्या पलीकडचे जग या छायाचित्र प्रदर्शनात अनुभवायला मिळाले. महापालिकेच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरविण्याची संधी महापालिकेला मिळाली, यापुढे महापालिका या प्रदर्शनाच्या पाठीशी राहिल असे अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले.

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी मनोगतात ठाणे महापालिकेने सहकार्य केल्याबद्दल आयुक्त सौरभ राव यांचे आभार व्यक्त केले. या स्पर्धेसाठी देशभरातून छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे नमूद केले.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ‘Wild Life’ या विषयात प्रथम पारितोषिक हिरा पंजाबी, द्वितीय संदीप यादव, तृतीय लाझरस पॉल यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक हिरा पंजाबी आणि बिजू बोरो यांना प्राप्त झाले आहे.’Performing Art’, या विषयामध्ये प्रथम पारितोषिक गणेश नामदेव मेमाने, द्वितीय मनोज गोविंद मुसळे, तृतीय संजय बप्हाटे यांनी पटकाविला असून उत्तेजनार्थ क्रमांक शंतनु बोसे, अरुल डॅनम होरिझन यांना मिळाले.

‘Festival’, या विषयामध्ये प्रथम राकेश रावळ, द्वितीय शरद पाटील, तृतीय आकाश येवगे यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक श्रवण तांडलिया व शंतनु दास यांनी पटकाविले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी 50,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु.25,000/ तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 15,000/- चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- देण्यात आले.

राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या ‘News Photo’ या विषयामध्ये प्रथम पारितोषिक सतेज शरद शिंदे, द्वितीय अरुल होरिझन, तृतीय अंशुमन पोयरेकर यांनी प्राप्त झाले असून उत्तेजनार्थ पारितोषिक दिपक जोशी व के.के. चौधरी यांनी पटकाविले. ‘Photo Features (story) या विषयात प्रथम पारितोषिक अमित चक्रवर्ती, द्वितीय नागोंडा पाटील, तृतीय सतीश विष्णु काळे यांनी पटकाविले आहे. ‘Wedding’, या विषयात प्रथम पारितोषिक धनराज उदयकांत कडलक, द्वितीय अश्पकाली किल्लेकर, तृतीय शादाब खान यांनी पटकाविला असून उत्तेजनार्थ पारितोषिक सौरभ नाझरे, अनिकेत गुरव यांना प्राप्त झाले आहे. राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी 25,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु.20,000/ तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 10,000/- चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- देण्यात आले.

जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या ‘Monsoon या विषयात प्रथम पारितोषिक राकेश रावळ, द्वितीय के.के. चौधरी, तृतीय निलेश पाष्टे यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक दिपक जोशी, के.के. चौधरी यांना प्राप्त झाले आहे. ‘Thane News 24’ या विषयात प्रथम पारितोषिक सचिन देशमाने, द्वितीय प्रफुल्ल गांगुर्डे यांनी पटकाविले आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेतील दोन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रु. 20,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 15,000/- तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 10,000/- तर चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु. 3,000/- देण्यात आले.

तसेच महाविद्यालयीन तरुणतरुणींसाठी ‘Reflection’ हा विषय ठेवण्यात आला होता, मोबाईलच्या माध्यमातून सदरची छायाचित्रे पाठविण्यात आली होती. यामध्ये प्रथम पारितोषिक महेश आंब्रे, द्वितीय सई चासकर तृतीय शिवाजी धुते यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक कौशिक व पियूष पाष्टे यांनी पटकाविले आहे. तर ‘Daily Life’ या विषयात प्रथम पारितोषिक शादाब खान, द्वितीय शंतनु बोसे, तृतीय कुणाल गव्हाने यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक हिमांशु मेस्त्री व निखिल पांचाल यांनी पटकाविले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्वांसाठी खुल्या असलेल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रु.20,000/- द्वितीय क्रमांसाठी प्रत्येकी रु. 15,000/-तृतीय क्रमाकांसाठी रु. 10,000/- तर चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- देण्यात आले.

या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकासह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.