Monday, March 8 2021 6:02 am

छातीत दुखू लागल्याने सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल.

कोलकत्ता – पुन्हा एकदा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची तब्येत बिघडली असून त्यांना रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते. दरम्यान त्यांच्या छातीत बुधवारी दुपारी थोडे दुखू लागले. प्रकृती बिघडल्याने कोलकत्तामधील अपोलो खासगी रुग्णालयात गांगुली यांना दाखल करण्यात आले आहे. अपोलो रुग्णालयातील डॉ. आफताब खान यांच्या देखरेखखाली आहेत.

२ जानेवारीला सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. त्यानंतर गांगुली यांना दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ जानेवारीला उपचारानंतर गांगुली यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली होती.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मिडियाशी संवाद साधला. ‘हा आयुष्याचाच एक भाग आहे. गोष्टी घडतच राहतात. पण, आता मी पूर्णपणे बरा आहे. किंबहुना येत्या काही दिवसांमध्येच या परिस्थितीवर माझं शरीर कशा पद्धतीनं उत्तर देतं हे पाहत मी कामाला सुरुवात करणार आहे’, असे सौरव गांगुली यांनी म्हटलं होते.