Thursday, June 20 2019 2:35 pm

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन अपहरण झालेल्या दोन महिन्याच्या बाळाची सुटका

ठाणे : मुलं पळवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल आहे , रस्त्यावर झोपणाऱ्या गरीबांची मुल उचलून नेणे , सरकारी हॉस्पिटल मधुन मुल चोरून नेणे असे प्रकार बरेच वाढत चालले आहे , या मुलांना चोरुन नेण्याच्या मागे प्रामुख्याने दोन कारण असतात , एक तर ज्यांना मूलबाळ नसत असे लोक मुल चौरतात आणी दुसर भिकाऱ्याना विकण्या साठी अशी मुल चोरली जातात , याच महिन्यात 11 तारखेला दीड वर्षाच्या मुलीच अपहरण करणाऱ्या महीला आरोपीला कोपरी पोलीसांनी पकडल होत , आणी या दीड वर्षाच्या मुलीची सुटका केली होती , फेब्रुवारी महिन्यात तिन तारखेला मुंब्रा येथुन सलमान खान वय 10 वर्ष हा त्याची बहीण सोनिया वय 9 वर्ष हिच्या बरोबर फिरत असताना एका बुरखाधारी महिलेने सलमान याचे अपहरण केले .त्याचा शोध पोलीस सर्वत्र घेत आहेत , पण अद्याप त्यांना यश आलेल नाही .

        मुल पळवण्याच्या या प्रकाराला आळा घालण्या साठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी विशेष मोहीम सुरू केली , गुन्हे शाखेचे उपायुक्त दिपक देवराज आणी सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे क्राईम ब्रांचची एक टीम तयार केली आणी त्यांना रेल्वे पोलिसांच्या सहाय्याने मुल पळवण्याऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले , त्या प्रमाणे मुंब्राच्या मुल पळवण्याच्या गुन्ह्याचा तपास ठाणे क्राईम ब्रांच यूनिट 1 हे सातत्याने करत होते , घटना स्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध घेण्यात येत होता परंतु काहीएक माहीती प्राप्त होत नव्हती , त्याच दरम्यान 29/03/2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलस वरून 2 महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याचे व त्या बाबत 363 प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याची माहीती पोलिसांना मिळाली , त्या प्रमाणे ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकाने मुल पळवलेल्या ठिकाणी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहीती रेल्वे पोलीस , एल .सी .बी व रेल्वे सुरक्षा बल यांच्या कडुन घेतली , त्या मध्ये अपहरण केलेली महिला दिसुन आली होती , त्या महिलेचा शोध घेण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकावर , सार्वजनिक ठिकाणी महिलेचा फोटो प्रसिध्द करून तिच्या बाबतीतची माहीती देण्याचे आव्हान करण्यात आले होते .

        या गुन्ह्याचा तपास करीत असताना , ही महिला नाशिक परिसरात असल्याची माहीती मिळाली त्या बरोबर वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली ठाणे क्राईम ब्रांचचे एक पथक नाशिक येथे रवाना झाले , त्या पथकाने या महिलेचा शोध घेउन श्रध्दा पार्क , रामवाडी , पंचवटी नाशिक येथुन दिनांक 14/4/2019 रोजी ताब्यात घेतले , या महिलेचे नाव नीलम संजय बोरा असे आहे , तिचे वय 35 वर्ष असुन तिला मूलबाळ नाही , तिच्या ताब्यातून दोन महिन्याचे बाळ पोलीसांनी ताब्यात घेतले , या बाळा बाबत तिच्या कडे चौकशी केली असता तिने हे बाळ 29/3/2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन चोरल्याचे सांगीतले , या आरोपी महिलेला बाळासह ठाणे क्राईम ब्रांच येथे आणुन पुढील कारवाई साठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे .